तुम्हाला येतो का कामाचा कंटाळा? किंवा तुमच्या मनात भीती असते आपली काम वेळेत होईल की नाही मग एकदा वापरून बघाच "कॅटी मिल्कमन" यांचं प्रभावी तंत्र "टेम्पटेशन बंडलिंग"
टेम्पटेशन बंडलिंग पद्धत काय आहे?
टेम्पटेशन बंडलिंग हा चालढकल थांबवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
ही एक साधी पण प्रभावी मानसिकता बदलणारी पद्धत आहे जी तुम्हाला कठीण किंवा कंटाळवाणी कामे पुर्ण करण्यास मदत करते.
हे काम कस करत?
या पद्धतीमध्ये तुम्ही दोन वेगळ्या गोष्टींना एकत्र जोडता जसे की,
(अ) तुमची आवडती गोष्ट : अशी गोष्ट जी करताना तुम्हाला खुप आनंद मिळतो. उदा. गाणी ऐकणे, नेटफ्लिक्स वर सिरीज बघणे.
(ब) तुमची गरजेची गोष्ट : अशी गोष्ट जी तुमच्या प्रगतीसाठी महत्वाची आहे पण तुम्ही टाळता उदा. व्यायाम करणे, अभ्यास करणे, घर साफ ठेवणे.
टेम्पटेशन बंडलिंग ची काही उदाहरणे :
व्यायाम आणि मनोरंजन : तुमच्या आवडत्या वेब सिरीजचा भाग तुम्ही तेव्हाच पाहायचा जेव्हा तुम्ही एखादा व्यायाम करत असाल किंवा वॉकिंग करत असाल
घरकाम आणि पॉडकास्ट : घराची साफसफाई किंवा भांडी घासताना तुमचे आवडते पॉडकास्ट किंवा गाणी ऐकणे.
टेम्पटेशन बंडलिंगचे फायदे :
1) प्रलंबन कमी होते :
कठीण काम करताना तुम्हाला आनंद देणारी गोष्ट सोबत असल्यामुळे तुम्ही ते काम टाळत नाही.
2) शिस्त लागते :
तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी कठीण काम पुर्ण करावेच लागते ज्यामुळे नकळत शिस्त लागते.
3) वेळेचे नियोजन :
दोन गोष्टी एकत्र केल्याने वेळेची बचत होते. आणि काम मार्गी लागतात
निष्कर्ष :
आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की कामात यश मिळवण्यासाठी फक्त कठोर परिश्रम हवेत, पण खरं तर तिथे 'स्मार्ट वर्क'ची गरज असते. 'टेम्पटेशन बंडलिंग' वापरून आपण आपल्या मेंदूला कंटाळवाण्या कामातही आनंद शोधायला लावतो. यामुळे चालढकल थांबते आणि आपण आपल्या वेळेचे खऱ्या अर्थाने मालक बनतो. हे तंत्र वापरा आणि तुमच्या उत्पादकतेमध्ये (Productivity) होणारा बदल स्वतः अनुभवून पहा.