प्रिय निलय (भाग - तीन )

खर तर निलयसाठी सुधा त्याच्याशी चांगल वागली चांगल बोलली आणि अभ्यासाला ही वेळ दिला हेच खुप महत्वाचं होत आणि त्याच आनंदात निलय आपला अभ्यास टाकून बाहेर गेला आणि आनंदीला शोधू लागला.

काही वेळा नंतर...

"आनंदी... कुठे होतीस तु अं आई किती काळजीत होती चल आता थोड्या वेळ अभ्यासाला बस." आनंदीला बघताच निलय म्हणाला

"दादा माझा अभ्यास जर तु आहेस करायला तर मी का करू मला आज बाईंनी खुप होमवर्क दिला आहे तर मी येई पर्यंत तेवढा होमवर्क करून ठेव नाही तर मी आईला सांगेन हं तु माझ ऐकत नाहीस म्हणून जा माझा अभ्यास करून ठेव मी येई पर्यंत." उलट बोलत आनंदी निलयला म्हणाली

"ही कुठली पद्धत आहे वागण्याची आनंदी सॉरी म्हण दादाला तो तुला बोलवायला आला होता न आणि तुझा अभ्यास तो का करेल त्याचा अभ्यास सोडून बोल परीक्षा जवळ आली आहे त्याचा अभ्यास सोडून आता तो तुझी परीक्षा पण देईल का? सॉरी म्हण पटकन त्याला." तीच बोलण ऐकून सर्जेराव ओरडले.

"सॉरी दादा परत अस नाही बोलणार." रडवेला चेहरा करत आनंदी म्हणाली

आणि तडक आपल्या घरी पळत गेली.

"आई... ए आई ऐक न ग बाबा मला सगळ्यांसमोर ओरडले मी दादाला फक्त एवढच म्हणाले की माझा होमवर्क मी येई पर्यंत करून ठेव तर यावरून ते मलाच ओरडले." रडत रडत आनंदी ने तक्रार केली 

"काय तु तुझा अभ्यास त्याला करायला सांगितलस वेड बीड लागलय का तुला आणि हो आता परीक्षा जवळ आलीये तेव्हा खेळण कमी कर कळाल का जरा स्वतः ही अभ्यास करत जा तुझा पेपर निलू देणार नाहीये जा तोंड हात पाय धु देवाला दिवा लाव आणि दोघ अभ्यासाला बसा जा लवकर." चिडून सुधा म्हणाली 

त्यावेळी खर तर सुधा पहिल्यांदाच आनंदी वर चिडली होती तिची इच्छा होती आनंदीला निलय पेक्षा जास्त मार्क पडायला हवेत आणि तीला हे ही माहित होत आनंदीचा अभ्यास निलयच घेऊ शकतो पण त्याने किती ही अभ्यास घेतलेला असो पास आनंदी लाच व्हावं लागेल ते ही स्वतः अभ्यास करून म्हणून ती आनंदीला ओरडली 

पण सुधा चा तो अवतार बघून आनंदी मात्र सरप्राईज्ड झाली आणि म्हणाली 

"आई अग तुच सांगतेस न मला तुझा सगळा अभ्यास दादा कडुन करून घेत जा मग आज काय झाल." आश्चर्याने आनंदीने विचारलं

"हे बघ मला जास्त बडबड नको आहे परीक्षा जवळ आलीये न मग आता जरा अभ्यासाकडे लक्ष दे आणि मी तुला त्याच्या कडून अभ्यास करून घ्यायला सांगितलं नाही तर त्याची मदत घ्यायला सांगितलं अभ्यासात आता जास्त विचारत बसू नकोस कळल जा जे सांगितलं आहे ते कर लवकर." परत चिडून सुधा म्हणाली 

तीच बोलण ऐकून रडवेली होत आनंदी तडक आवरायला निघून गेली.

काही वेळा नंतर...

निलय आपल्या खोलीत अभ्यासाला बसला होता तोच आपल आवरून आनंदी खोलीत आली.

"दादा मी येऊ का आत?" आनंदीने विचारलं

"हो ये की मी तुला कधी अडवलं आहे का ये." अभ्यास करता करता निलय म्हणाला 

आणि लगेच आनंदी खोलीत आली पण यावेळी आनंदीच्या स्वभावात मात्र फरक होता तिच्या मनात एक गोष्ट घर करून राहिलेली होती ती म्हणजे दादा मुळे आज आपल्याला आई आणि बाबांची बोलणी खावी लागली ही खर तर एक छोटीशी ठिणगी होती पण ती ठिणगी मात्र लागली होती 

"दादा आज बाईंनी खुप होमवर्क दिला आहे आम्हाला." बुक्स काढत आनंदी म्हणाली

"बघू काय होमवर्क आहे तुमचा." निलय ने विचारलं 

"हे बघ हे टॉपिक शिकवलं आज बाईंनी आणि त्याचे हे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर शोधून लिहायची आहेत." विषय दाखवत आनंदी म्हणाली 

"अच्छा मग आता आधी तु हे टॉपिक वाचून बघ बर तुला उत्तर सापडताएत का नीट मन लावून वाच आणि जर तरीही तुला उत्तर सापडली नाहीत तर मग मी तुला उत्तर शोधून देतो ओके" निलय ने समजावलं 

आणि लगेच दोघ ही अभ्यास करू लागले.

क्रमशः...

काय आधीपासून सुधाच्या मनात निलय साठी कटुता आहेच पण आता त्या एवढ्याशा आनंदी च्या मनात देखील कटुता निर्माण झाली आहे का हे बहीण भावाचं नात आता दोघांना कुठे नेईल बघुत पुढील भागात

कधी शब्दांतून संवाद साधते, तर कधी शांततेतुन खुप काही सांगुन जाते... मी धनश्री काजे - या ब्लॉगवर मी माझे अनुभव, आणि मनातले विचार मोकळेपणाने व्यक्त करते. हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे स्वतःला शोधण्याचा आ…

Post a Comment