Tuesday, 9 December 2025

थंडीची चाहूल

थंडीची चाहूल म्हणलं तर आठवतो गरम वाफाळलेला चहा, बोचरी थंडी, आणि सकाळची शुद्ध थंड हवा तसेच धुक्याने नटलेला निसर्ग.
तो दिवस मला आजही आठवतो. मी त्याला म्हणजेच साहिलला लग्न ठरल्या नंतर पहिल्यांदाच म्हैसमाळला घेऊन गेले होते ती ट्रिप आमची सगळ्यात जास्त लक्षात राहण्यासारखी झाली होती. आम्ही एकूण दहा जण ट्रीपला गेलो होतो त्यात माझी भावंड आणि त्याची भावंड ही होती.
आम्ही बरोबर सकाळी सहा वाजता कार सुरु केली आणि आमचा प्रवास सुरु झाला.
सोबत मैत्री करायला थंडगार हवा आणि समोर धुके होतेच त्यावेळी ती थंडगार हवा इतकी थंड होती की आम्हाला कार मधल्या एसीची सुद्धा गरज भासली नाही आमची कार सुसाट म्हैसमाळच्या दिशेने पळत होती एक एक गाडयांना एक एक झाडांना मागे टाकत.

काही वेळा नंतर...

एका मध्यवर्ती असलेल्या हॉटेल समोर आम्ही आमची कार थांबवली. आणि चहा नाश्त्यासाठी खाली उतरलो. एव्हाना धुक्यांच्या पाऊलखुणा विरून गेल्या होत्या आणि सूर्याच्या सोनेरी किरणांनी आकाश अच्छादुन टाकले होते पण थंडी अजुन ही तशीच होती आम्ही आमचे स्वेटर शाली सावरत कार मधून उतरलो.

आणि हॉटेलमध्ये शिरलो हॉटेलमध्ये शिरताच खमंग मुगाची भजी आणि गरम गरम वाफाळलेल्या चहाने आमचे स्वागत केले आणि आम्ही लगेच त्यावर ताव मारला.

आणि परत कार मध्ये येऊन बसलो. आणि परत सुसाट वेगाने आमची कार सुरु झाली आणि कार बरोबरच आमच्या गप्पा ही सुरु झाल्या. कुणी शांत बसलं होत तर कुणी गाणी गुणगुणात होत त्याच बरोबर आमची कार देखील सुरु होती.

साधारणतः एक तासानी...

मौज गप्पा गाणी म्हणत म्हणत आणि मध्ये मध्ये वाफाळलेल्या चहाचा आनंद घेत आम्ही म्हैसमाळच्या श्री बालाजी मंदिराच्या दाराजवळ येऊन पोहोचलो.

आणि जस कार मधून खाली उतरलो तस परत एकदा थंड हवेने आमचे स्वागत केले आणि आम्ही दर्शन घ्यायला मंदिरात प्रवेश केला.

तेव्हा तर आजूबाजूची सृष्टी इतकी वीलोभनीय दिसत होती जस काही पुर्ण सृष्टीच आमच्या स्वागतासाठी हजर झाली आहे. आम्ही सगळ्यांनी बालाजीचे दर्शन घेतले आणि थोड्यावेळ तिथेच आराम केला. बरोबर काही खेळाचे देखील सामान घेतलेच होते त्याचा ही आनंद घेतला.

मी आणि साहिल मात्र तिथेच बसून राहिलो आणि गप्पा मारू लागलो त्या काही तासाच्या भेटीत आमचं नात अधिक घट्ट बनल होत.

काही वेळा नंतर...

निसर्गाचा आनंद घेऊन आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो.

ही थंडीची चाहूल आम्हाला खुप काही शिकवून गेली आणि आमचं नात अधिक घट्ट करून गेली.

नोट : सदर आठवण काल्पनिक आहे.
#थंडीचीचाहूल #अंतर्मन #माझीडायरीमाझेविचार 

No comments:

Post a Comment

समाधान

डियर सखी... समाधान. हा एकच शब्द मनावरचा सगळा ताण कमी करून टाकतो मन समाधानी असेल तर आयुष्यात सुखाची नांदी होते. कारण कसलच टेन्शन ...