Wednesday, 24 December 2025

समाधान

डियर सखी...
समाधान. हा एकच शब्द मनावरचा सगळा ताण कमी करून टाकतो मन समाधानी असेल तर आयुष्यात सुखाची नांदी होते.
कारण कसलच टेन्शन नसतं मन निखळ स्वच्छ असत त्यामुळे आयुष्यात एक प्रकारची सकारात्मकता असते. सखी आपण समाधानी असलो न तर आपली सगळी काम परस्पर होऊन जातात आणि मनावरच ओझं कमी होत म्हणून सांगते जीवनात समाधानी रहा त्याच्यावर सोड म्हणजे सगळ बरोबर होईल

Saturday, 20 December 2025

प्रिय निलय (भाग - दोन )

हळू हळू तीने सगळं घर आपला नवरा सगळं काही आपल्या ताब्यात घेतल आणि मग ती म्हणेल ती पूर्वदिशा असा दिनक्रम असायचा.

वेळ सकाळची 7 वाजताची...

निलय सकाळीच लवकर उठला आणि आपल आवरू लागला आज तो खुप दिवसानी शाळेत जाणार होता त्यामुळे तो खूपच उत्साहित होता.

निलय खर तर खुप हुशार होता त्याला प्रत्येक कामात रस असायचा तो अभ्यासात देखील खुप हुशार होता म्हणूनच की काय त्याच नेहमी कौतुक ही होत असे.

सकाळी लवकर उठायचं थोडयावेळ अभ्यास करायचा नंतर सुधाला कामात मदत करायची आणि मग शाळेची वेळ होण्या आधीच शाळेत जायचं नंतर घरी आल्यावर परत आईला मदत करायची मग अभ्यासाला बसायचं आणि रात्री जेवण करून झोपायचं असा त्याचा दिनक्रम होता.

त्याला इतर मुलांसारखं खेळ मस्ती काही माहीतच नव्हत. पण आनंदीच तस नव्हत आनंदी नेहमी शाळेतून घरी आली की लगेच आपल दप्तर बेड वर टाकून आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर खेळायला पाळायची आणि 7, 7:30 ला दिवे लागणीच्या वेळेस घरात यायची तीचा बराचसा अभ्यास देखील निलयच करायचा त्यामुळे आनंदीला तसच जगण्याची सवय लागली होती.

सर्जेराव नेहमी सुधाला समजून सांगत. "दोन्ही आपलीच मुलं आहेत असा भेदभाव करत जाऊ नकोस थोड काम आनंदीला ही सांगत जा."

पण त्यांच्या बोलण्याकडे सुधा शपशेल दुर्लक्ष करत असे आणि तिला जे करायचं तेच करत असे.

असच एक दिवस आनंदी आणि निलय दोघांची परीक्षा जवळ आली होती त्यामुळे निलयची परीक्षेची जोरात तयारी सुरु झाली पण आनंदी च मात्र अभ्यासात लक्ष नव्हत त्यामुळे सुधाला आनंदीची खुपच काळजी वाटू लागली आणि तीने ठरवलं आपण परीक्षा होई पर्यंत निलयशी चांगल वागायचं आणि त्यालाच आनंदीचा अभ्यास घ्यायला सांगायचं मग पुढच पुढे बघता येईल.
असा विचार करून ती निलयला म्हणाली.

"निलू बाळा, अभ्यास चांगला सुरु आहे न? खुप अभ्यास कर बर का या वर्षी सुद्धा पास व्हायचं आहे तुला, बर मी अस ऐकलं आहे तु अभ्यासात खुप हुशार आहेस आनंदी तुझी छोटी बहीण आहे न मग तिला ही घेऊन बसत जा की अभ्यासाला तुझ्यामुळे ती सुद्धा अभ्यास करत जाईल चालेल न तुला कामा कडे अजिबात लक्ष देऊ नकोस मी सगळ बघेन तुम्ही दोघ अभ्यासात लक्ष द्या बस आणि तिला काही मदत लागली तर ती मदत ही कर काय." कधी नव्हे ते गोडीत बोलून सुधा म्हणाली.

भोळ्या निलयला आपण काय बोलाव हेच समजलं नाही आज पहिल्यांदा आई आपल्याशी गोड बोलत आहे याचच त्याला समाधान वाटत होत आणि त्याच समाधानात तो सुधाला म्हणाला.

"हो आई तु काळजी करू नकोस मी माझा अभ्यास करत जाईन आणि आनंदी चा ही अभ्यास घेत जाईन पण ती आहे कुठे?" निलयने अभ्यास करता करता विचारलं

"असेल इथेच कार्टी खेळत असेल अभ्यास म्हणलं की तिला भारी कंटाळा आता तुच काय ते बघ बाबा मी तर तिच्या पुढे हात टेकले आहेत." वैतागून सुधा म्हणाली 

"आई तु काळजी करू नकोस मी तिला समजून सांगतो आणि तीचा अभ्यास पण घेतो." निलय धिर देत म्हणाला

आणि लगेच आपला अभ्यास टाकून आनंदीला बोलवायला बाहेर गेला.

खर तर निलयसाठी सुधा त्याच्याशी चांगल वागली चांगल बोलली आणि अभ्यासाला ही वेळ दिला हेच खुप महत्वाचं होत आणि त्याच आनंदात निलय आपला अभ्यास टाकून बाहेर गेला आणि आनंदीला शोधू लागला.

क्रमशः...

तर आपली मुलगी अभ्यास करत नाही तिला लोकांनी चांगल म्हणावं म्हणून सुधा निलयशी गोड बोलली काय की याच्या मागे सुधाचा अजुन ही कुठला हेतू आहे का बघुत पुढील भागात 

Monday, 15 December 2025

प्रिय निलय (भाग - एक )

प्रिय निलय...
खुप दिवसा पासून तुझ्या रिप्लाय ची वाट बघत आहे वाटलं मेल वाचल्यावर तुला माझी ओळख पटली असेल पण अजुन तुझा मला रिप्लाय आला नाही म्हूणन ओळख पटावी यासाठी एक फाईल अटॅच्ड करत आहे वेळ मिळाला तर नक्की मेल वाच.
मान्य आहे आता तु खुप मोठा झाला आहेस तुझ्या पुढे मागे किती तरी लोक गराडा घालून असतात. पण शेवटी तु ही अगदी छोट्या तुन सुरवात केली आहे न मग तु तुझे जुने दिवस जुने लोक कसे विसरू शकतोस.
मोठ असण चूक नाही रे पण मोठ होत असताना आपले पाय जमिनीवर आहेत की नाही हे तरी एकदा तपासाव मान्य आहे आपल्या कडे एकमेकांचे नंबर्स नाहीत पण ई - मेल आय डी तर आहे करावा एखादा मेल.
हरकत नाही तु जसा आहेस तसा माझा प्रिय मित्र आहेस तुला मला रिप्लाय देता नाही आला तरी चालेल पण ती आठवण तरी एकदा पहा.
मला खात्री आहे तुला नक्कीच ओढ वाटेल एका सुंदर नात्याची. बाकी प्रत्यक्ष भेटल्यावर बोलुत.
शेवटी तुझा वेळ महत्वाचा आहे न काळजी घे.
तुझी ओळख न पटलेली.
XXX मैत्रीण 

अरे बाप रे... हा कुठला मेल आहे असा? आणि हा निलय कोण काय आहे याची कहाणी.

स्वप्न वेल निवास...
वेळ सकाळची...

"काय हे कोण मला हा असा मेल करत असत साधं नाव पण लिहीता येत नाही लोकांना." निलय सकाळीच वैतागून म्हणाला 

"असेल कुणी तरी इतकं वैतागून नका जाऊ द्या सोडून कुणी तरी फ्रॅंक केला असेल." राधीने समजावलं 

पण नेमक निलय कोण आहे आणि काय आहे त्याची कहाणी.

भूतकाळात...
मुंबई हायकोर्टात...

"याच वय लक्षात घेता हे नयालय याला बालसुधार गृहात पाठवायची शिक्षा सुनावत आहे." न्या. जगदीश यांनी निर्णय सुनावला.

आणि त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आलं.

निलय. साधारण 14 15 वर्षाचा आईविना वाढलेल. पोर. मळकट से अंगावर कपडे केस विसकट लेले फाटलेले कपडे नाकाला लटकलेला शेंमबुड असा त्याचा अवतार. घरी त्याच्यावर वडिलांचे कधी लक्ष नव्हतेच पण सावत्र आई मात्र चांगलेच लक्ष देत असे.

निलय मन मिळाऊ होता समंजस होता त्याने आई गेल्यावर स्वतःला बऱ्यापैकी सावरल होत पण जस तो स्वतःला सावरायला शिकला तस वडिलांनी दुसर लग्न केल आणि त्याच्यासाठी एक सावत्र आई घेऊन आले. मग काय जेवढी मेहनत घेऊन तो सावरला होता ते बघून एका क्षणात त्याच अवसान गळुन पडल. आणि मग रोज त्याची मेल्याहून मेल्यासारखी अवस्था व्हायची.

सुधा आणि सर्जेराव एकाच ऑफिस मध्ये काम करणारे दोघांच आयुष्य ही सारखच सर्जेरावांना निलय हा एकुलता एक मुलगा होता तर सुधाला देखील आनंदी ही एकुलती एक मुलगी होती.

सर्जेरावांना आपली दोन्ही मुलं सारखीच होती त्यांच आपल्या दोन्ही मुलांवर अपार प्रेम होत. पण म्हणतात न "किती ही झाल तरी सख्ख ते सख्खच असत." सर्जेरावांनी दोघांना किती ही प्रेम दिलेलं असेल तरी सुधाला मात्र असच वाटायचं की "ह्यांचं फक्त आणि फक्त निलय वरच प्रेम आहे" आणि याच भावने मुळे ती निलयचा द्वेष करू लागली.

हळू हळू तीने सगळं घर आपला नवरा सगळं काही आपल्या ताब्यात घेतल आणि मग ती म्हणेल ती पूर्वदिशा असा दिनक्रम असायचा.

क्रमशः...

काय निलय एका बाल सुधारगृहात रहात होता? की कथेत अजुन कुठला नवीन ट्वीस्ट आहे बघुत पुढील भागात 

Saturday, 13 December 2025

मैत्री

आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात काही नाती खुप स्पेशल असतात तर काही नाती मात्र नकोशी वाटतात. पण नात्यांमुळेच तर जीवनाला अर्थ असतो.
पण कोण ठरवू शकत जीवनात कुठली नाती असावीत आणि कुठली नाती नसावीत. हे ठरवण खर तर कठीण आहे पण आपण आपापल्या नात्याची व्याख्या तर ठरवू शकतोच. हे झाल नात्या बद्दल पण मी बोलत आहे मैत्रीच्या नात्या बद्दल.
मैत्री. जिवाभावाचे मित्र - मैत्रिणी आपल्या आयुष्यात पावलो पावली आपल्याला कुणी न कुणी भेटतच असत आणि त्या - त्या व्यक्तीनुसार मैत्रीच्या श्रेणी बनतात हो श्रेणीच.
बालपणीचे मित्र - मैत्रिणी, शाळेतले मित्र - मैत्रिणी, ऑफिस मधले मित्र - मैत्रिणी, सोशल मीडियावर झालेले मित्र - मैत्रिणी. बघा किती कॅटेगरीज झाल्या पण फक्त मैत्री असणं पुरेसं आहे का? खरी मैत्री कशी असावी कोण सांगेल? कुठले गुण असावेत खऱ्या आणि जिवाभावाच्या मैत्रीत.
चला थोड जाणून घेवूत गुणांबद्दल आणि बोलूयात मैत्री बद्दल.

खऱ्या मैत्रीचे गुण :
खरी मैत्री हे एक मौल्यवान आणि सुंदर नात आहे.

मैत्रीच्या नात्यातील 6 गुण :

1) विश्वास आणि प्रामाणिकपणा : मैत्रीचा आधार म्हणजे एकमेकांवर असलेला अतुट विश्वास. खरे मित्र नेहमी एकमेकांशी प्रामाणिक राहतात मग सत्य किती ही कठीण असो.

2) निष्ठा आणि समर्थन : खरा मित्र तुमच्या चांगल्या वाईट काळात निष्ठावान राहतो ते तुमच्या निर्णयाचे आणि प्रयत्नांचे समर्थन करतात.

3) सहानुभूती आणि काळजी : ते तुमच्या भावना समजून घेतात तुमच्या आनंदात आनंदित होतात आणि तुमच्या दुःखात सहभागी होतात ते तुमची खरोखर काळजी करतात.

4) निःस्वार्थता आणि समर्पण : त्यांच्या मैत्रीत स्वार्थ नसतो गरज पडल्यास ते कोणताही मोबदला न घेता मदत करण्यासाठी समर्पित असतात.

5) स्वीकार आणि आदर : खरे मित्र तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारतात. तुमच्यात कमतरता असून ही तुमचा आदर करतात.

6) वेळ देणे : कामातून वेळ काढून ते तुमच्या सोबत वेळ घालवतात आणि तुम्हाला त्यांची गरज असताना उपलब्ध असतात.
मग तुम्ही कुठल्या प्रकारचे मित्र आहात.

निष्कर्ष : 

मैत्रीचे नाते केवळ श्रेणींमध्ये विभागून किंवा व्याख्या करून पूर्ण होत नाही, तर ते या सहा मूलभूत गुणांवर जगण्यावर आणि त्यांची जपणूक करण्यावर अवलंबून असते.
​खरी मैत्री म्हणजे एक असा आधारस्तंभ आहे, जिथे तुम्ही जसे आहात तसे सुरक्षित आणि सन्मानित अनुभवता. तुमच्यातील कमतरता असूनही तुमचा आदर होतो आणि गरज पडल्यास निःस्वार्थ मदत मिळते. त्यामुळे, आपल्या आयुष्यातील नात्यांची व्याख्या आपण स्वतः ठरवतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या मैत्रीच्या नात्याची गुणवत्ता देखील या गुणांच्या आधारावर तपासू शकतो.
​महत्वाचा प्रश्न: तुम्ही इतरांसाठी आणि तुमच्या मित्रांसाठी हे सहा गुण जपता का? कारण, खऱ्या मैत्रीचा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण स्वतः प्रथम एक उत्तम आणि खरा मित्र बनतो.

Wednesday, 10 December 2025

अतुट धागा

अतुट धागा प्रीतीचा
प्रेमाने जपत आहे

आज तुला आठवत
मी आरशात स्वतःलाच न्याहाळत आहे

जीव तुझ्यात गुंतला माझा
हे मी स्वतःलाच सांगत आहे.

अतुट धागा प्रीतीचा
मी प्रेमाने जपत आहे 

चाहूल लागताच मनाला
अचानक होई तुझा भास

तुझी आठवण येताच
होई दिवस माझा खास

ये ना रे आता आयुष्यात माझ्या
का मला छळतोस असा 

तुझ्या माझ्या नात्याचा
अतुट आहे धागा 
#कविता #अतुटधागा #माझीडायरीमाझेविचार


Tuesday, 9 December 2025

थंडीची चाहूल

थंडीची चाहूल म्हणलं तर आठवतो गरम वाफाळलेला चहा, बोचरी थंडी, आणि सकाळची शुद्ध थंड हवा तसेच धुक्याने नटलेला निसर्ग.
तो दिवस मला आजही आठवतो. मी त्याला म्हणजेच साहिलला लग्न ठरल्या नंतर पहिल्यांदाच म्हैसमाळला घेऊन गेले होते ती ट्रिप आमची सगळ्यात जास्त लक्षात राहण्यासारखी झाली होती. आम्ही एकूण दहा जण ट्रीपला गेलो होतो त्यात माझी भावंड आणि त्याची भावंड ही होती.
आम्ही बरोबर सकाळी सहा वाजता कार सुरु केली आणि आमचा प्रवास सुरु झाला.
सोबत मैत्री करायला थंडगार हवा आणि समोर धुके होतेच त्यावेळी ती थंडगार हवा इतकी थंड होती की आम्हाला कार मधल्या एसीची सुद्धा गरज भासली नाही आमची कार सुसाट म्हैसमाळच्या दिशेने पळत होती एक एक गाडयांना एक एक झाडांना मागे टाकत.

काही वेळा नंतर...

एका मध्यवर्ती असलेल्या हॉटेल समोर आम्ही आमची कार थांबवली. आणि चहा नाश्त्यासाठी खाली उतरलो. एव्हाना धुक्यांच्या पाऊलखुणा विरून गेल्या होत्या आणि सूर्याच्या सोनेरी किरणांनी आकाश अच्छादुन टाकले होते पण थंडी अजुन ही तशीच होती आम्ही आमचे स्वेटर शाली सावरत कार मधून उतरलो.

आणि हॉटेलमध्ये शिरलो हॉटेलमध्ये शिरताच खमंग मुगाची भजी आणि गरम गरम वाफाळलेल्या चहाने आमचे स्वागत केले आणि आम्ही लगेच त्यावर ताव मारला.

आणि परत कार मध्ये येऊन बसलो. आणि परत सुसाट वेगाने आमची कार सुरु झाली आणि कार बरोबरच आमच्या गप्पा ही सुरु झाल्या. कुणी शांत बसलं होत तर कुणी गाणी गुणगुणात होत त्याच बरोबर आमची कार देखील सुरु होती.

साधारणतः एक तासानी...

मौज गप्पा गाणी म्हणत म्हणत आणि मध्ये मध्ये वाफाळलेल्या चहाचा आनंद घेत आम्ही म्हैसमाळच्या श्री बालाजी मंदिराच्या दाराजवळ येऊन पोहोचलो.

आणि जस कार मधून खाली उतरलो तस परत एकदा थंड हवेने आमचे स्वागत केले आणि आम्ही दर्शन घ्यायला मंदिरात प्रवेश केला.

तेव्हा तर आजूबाजूची सृष्टी इतकी वीलोभनीय दिसत होती जस काही पुर्ण सृष्टीच आमच्या स्वागतासाठी हजर झाली आहे. आम्ही सगळ्यांनी बालाजीचे दर्शन घेतले आणि थोड्यावेळ तिथेच आराम केला. बरोबर काही खेळाचे देखील सामान घेतलेच होते त्याचा ही आनंद घेतला.

मी आणि साहिल मात्र तिथेच बसून राहिलो आणि गप्पा मारू लागलो त्या काही तासाच्या भेटीत आमचं नात अधिक घट्ट बनल होत.

काही वेळा नंतर...

निसर्गाचा आनंद घेऊन आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो.

ही थंडीची चाहूल आम्हाला खुप काही शिकवून गेली आणि आमचं नात अधिक घट्ट करून गेली.

नोट : सदर आठवण काल्पनिक आहे.
#थंडीचीचाहूल #अंतर्मन #माझीडायरीमाझेविचार 

समाधान

डियर सखी... समाधान. हा एकच शब्द मनावरचा सगळा ताण कमी करून टाकतो मन समाधानी असेल तर आयुष्यात सुखाची नांदी होते. कारण कसलच टेन्शन ...