"डायरी आपल्या मनाचा आरसा असते."
तुम्ही कधी डायरी लिहायचा प्रयत्न केला आहे का? तुम्ही डायरी कशी लिहीता? आणि डायरीत नेमक काय लिहीता? खर तर डायरी ही आपल्या आयुष्यातली एक अशी स्पेस असते जीथे आपण न घाबरता मन मोकळेपणाने आपली प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो. आणि त्याला कुणी जज सुद्धा करत नाही.
म्हणजे डायरी आपली एक अशी सखी आहे जी फक्त आणि फक्त आपलं म्हणणं विदाउट जजमेंट शांतपणे सगळ ऐकून घेते तिला काय बरोबर काय चूक याच्याशी काहीच घेणं देण नसतं ती फक्त ऐकत असते आणि आपण व्यक्त होत असतो.
तुम्ही तुमच्या सखीला काय सांगता?
डायरी लिखाणाचे तसे बरेच प्रकार आहेत :
कुणी आपल्या डायरीत आपले अनुभव लिहून ठेवत असतो. तर कुणी आपला दिनक्रम लिहून ठेवत असतो कुणाला कविता लिहून ठेवायची आवड असते तर कुणाला चालु घडामोडीवर आपले विचार लिहून ठेवायला आवडत असत. खर तर प्रत्येकाची लेखन करण्याची शैली ही वेगळी असते कुणी कुणी तर आपली स्वतःची च एक वेगळी शैली तयार करत असतो. एकूण काय तर लेखन करणं किंवा शैली तयार करणं हे महत्वाच नाही तर व्यक्त होणं कुठेतरी व्यक्त होणं महत्वाच आहे.
मला सांगा आपल्या कडे शेअर करायला खूप काही आहे पण आपण ते कुठे शेअरच करू शकलो नाही तर त्याच काय होईल म्हणून डायरी लिहीण महत्वाचं आहे.
डायरी लिखाणाचे काय फायदे आहेत?
डायरी लिखाणाचे खालीलप्रमाणे फायदे सांगता येतील
मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फायदे
1. स्वतःच्या भावना समजून घेता येतात: रोजच्या घडामोडी, आनंद, दुःख, राग यांना शब्दात उतरवल्यामुळे मन मोकळं होतं.
2. तणाव कमी होतो: मनात साठून राहिलेल्या भावना कागदावर उतरवल्याने हलकं वाटतं.
3. स्वतःशी संवाद होतो: आपल्या मनात काय सुरू आहे, हे शांतपणे पाहता येतं.
📈 स्व-विकासासाठी फायदे
1. स्वतःची प्रगती लक्षात येते: मागील नोंदी वाचून आपण कुठून सुरुवात केली आणि कुठे पोहोचलो हे कळतं.
2. ध्येय ठरवण्यास आणि त्यावर लक्ष ठेवण्यास मदत: रोजच्या नोंदीमुळे ध्येयांकडे लक्ष केंद्रित राहतं.
3. निर्णय क्षमता वाढते: विचार स्पष्ट होतात, त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाते.
✍️ लेखन कौशल्य वाढते
1. साहित्यिक अभिव्यक्ती सुधारते: रोज लेखन केल्याने आपली भाषा, विचार मांडण्याची पद्धत अधिक स्पष्ट आणि प्रभावी होते.
2. सर्जनशीलता वाढते: कल्पना, अनुभव, निरीक्षणे लिहीताना कल्पनाशक्तीला चालना मिळते.
🕰️ आठवणी जपण्यासाठी
1. गोड क्षण जतन करता येतात: आयुष्यातले खास क्षण, भेटीगाठी, संवाद यांचे सुंदर संग्रह तयार होतो.
2. भविष्यात वाचण्यासाठी खजिना: जुने पानं वाचताना पुन्हा एकदा ते क्षण अनुभवता येतात.
🛠️ स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी
1. चुका लक्षात येतात: आपण केलेल्या चुका लिहून ठेवल्यास, त्यापासून शिकता येतं.
2. नवीन सवयी तयार करता येतात: नियमित लिहिण्यामुळे शिस्त लागते, आणि आत्मनिरीक्षणाची सवय जडते.
थोडक्यात काय तर :
“डायरी लिहिणं म्हणजे स्वतःशी गप्पा मारणं, स्वतःला ओळखणं आणि स्वतःचं प्रतिबिंब पाहणं.”
#डायरी #अंतर्मन #माझीडायरीमाझेविचार