Saturday, 7 June 2025

लायब्ररी

डियर लायब्ररी,
लक्षात आहे ना ग तुला आम्ही सगळे कस आम्ही एकाच बेंच वर बसून गप्पा मारायचो आपली सुख दुःख शेअर करायचो तु तर आम्हाला बघतच असशील ना, तु आम्हाला खूप काही शिकवलं आहेस एक ओळख निर्माण करण्यास मदत केली आहेस. कारण तुझ्या अंगणात बसूनच तर आम्ही मोठं होण्याची स्वप्न बघितली आहेत ते एकत्र बसून गप्पा मारणं, नोट्स काढणं, मला आज ही लक्षात आहे. खर तर आम्हाला वाचनाची आवड सुद्धा तुझ्या मुळेच लागली हं.
किती ते तुझ्याकडे पुस्तकं होती मला तर कधी कधी वाटायचं आपण एखाद पुस्तकं घेऊनच टाकुत आणि नंतर नंतर तर झाल ही तसच मी पुस्तकं वेडी झाले.
शिव खेरांची पुस्तकं : यश तुमच्या हातात, आपण जिंकू शकता.
लुईस एल हे यांची पुस्तकं : यु कॅन हिल युअर लाईफ, यु कॅन युअर बॉडी, तसेच मिरर वर्क 
सरश्री ची पुस्तके : द मॅजिक ऑफ रायटिंग, 
अश्या बऱ्याच पुस्तकांची मला तुझ्या मुळेच ओळख झाली एक नवीन जग सापडलं तुझ्या मुळे वाचनाचा छंद लागला नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या तुझ्या मुळे आज भले ही आम्ही एक मेकांपासून दूर असेल पण मनाने तेवढेच जवळ आहोत कारण तूच तर आम्हाला खरी मैत्री शिकवलीस तुझ्या मध्ये घालवलेले क्षण ही आमच्यासाठी पर्वणीच होती आणि ती आम्ही कधीच विसरणार नाही.
या सगळ्या सुखांसाठी तुझे खूप खूप आभार. अजून काय बोलू तु तर सर्वच जाणतेस 
तुझीच एक निवासी 
XXX 
#अंतर्मन #लायब्ररी #माझीडायरीमाझेविचार 

No comments:

Post a Comment

समाधान

डियर सखी... समाधान. हा एकच शब्द मनावरचा सगळा ताण कमी करून टाकतो मन समाधानी असेल तर आयुष्यात सुखाची नांदी होते. कारण कसलच टेन्शन ...